Thursday, December 20, 2018

मृगजळ ( भाग -7)

श्री मिंटीग हॉल मध्ये पोहचताच त्याला समोर चेअर वर ऋतुजा बसलेली दिसली .. तिला बघून त्याच्या चेहर्यावर जो आनंद ओसरून वहात होता तो बघण्यासारखाच होता . त्याच्या चेहर्यावरचे भाव ऋतुजा पासून लपले नाही ... तो येताना बघून सर्व उभे झाले फॉर्मेलीटी म्हणून ऋतुजालाही उभं व्हावचं लागलं त्याच्या समोर " हँलो सर , माय सेल्फ ऋतुजा ईनामदार .... हे आमच्या अॉफीसचे तीन मेंमबर आहेत ." ती समोर काही बोलेल तोच तिला थांबवत श्री म्हणाला ," आय नो ... मिस् ऋतुजा प्लिज टेकअ सिट .." श्रीने प्रोजेक्ट बद्दल सविस्तर माहिती दिली ... अर्धा तास मिंटिग चालली . आता हा प्रोजेक्ट पुर्ण होईपर्यत श्री आणि ऋतुजाची भेट रोजचीच ठरली होती आठवड्याचा रविवार वगळला तर .... श्री जेव्हा PPT वरून प्रोजेक्ट एक्सप्लेन करून सांगत होता तेव्हा ऋतुजाच त्याच्या हावभावांकडे हातवार्यांनकडे ऐकूनच काय तर ती श्रीच्या प्रत्येक हालचालीकडे निरखून बघणं श्री सुद्धा तिच्याकडे चोरून लपून बघतचं होता .... प्रेजेन्टेश्न संपल सर्व हॉलचा बाहेर पडले . सर्व चाय कॉफी घेण्यात व्यस्त होते पण ऋतुजाचं कुठेच मन लागत नव्हतं ती एंकातात बसली होते कोण जाने तिच्या मनात काय चालू होतं . तिला घुसमट होत होती . घाबरल्या सारखं वाटतं होतं तिचा मनाला वाटलं आपल्याला ह्या अॉफीस मधला कर्मचारी फॉलो करतो आहे . ती त्या सर्वापासून लांब रहात होती तो तिच्या जवळ येण्याचा अधिक प्रयत्न करतं होता . त्याचं नावही ऋतुजाला माहिती नव्हतं . श्री च्या अॉफीस मध्ये पहिल्यादा प्रोजेक्ट तिच्या बॉसने डिल केलं होतं आणि ही त्याच्यासाठी सुवर्ण संधी होती , पण ऋतुजाला तिथे मात्र uncomfortable फिल होत होतं .... तो कर्मचारी ही त्याच्याच टिम मधला होता ज्याला श्रीनेच त्याच्या टिम मध्ये पार्टिसिपेट करून घेतलं होतं ... त्याची येता जाता सारखी नजर आता ऋतुजावर होती . ऋतुजाला भिती वाटायला लागली होती . तिला वाटतं होतं की आपण जाऊन श्री सरांना सांगाव तो मला फॉलो करतो आहे म्हणून ... पण सांगणार कसं त्याचं तर नावही तिला माहिती नव्हतं ... शिवाय कोण विश्वास करेल माझ्यावर ? ह्याच भितीत तिचा अख्खा दिवस गेला . सहा वाजले तिला घरी निघायचं होतं . पार्किंग मध्ये गाडी ठेवलेली होती अॉफीसच्या मागे . शिवानीला अँटोने जायचं होतं म्हणून ती निघून गेली . ऋतुजा पायर्यावरून चालतं असताना आपल्या मागून तिला कोणी येत असल्याचा भास होत होता समोर त्या व्यक्तीची सावली तिला पछाडत होती . ऋतुजा जशी पायरी उतरून खाली पाऊल ठेवतच तिचा पाय घसरला तर मागून कोणी तरी येत तिला पडताना हात धरून सावरलं ऋतुजा चक्क घाबरलीच . परत मागे जिण्याच्या दिशेने बघू लागली . आपल्या समोर $श्री ला बघून तिने त्याचा जवळ जातच ..... " सर कोणीतरी मला फॉलो करतं आहे ." म्हणून रडू लागली .... " अरे हे बघा असं रडू नका प्लिज कोणी नाही आहे तुम्हाला भास होतो आहे . " श्री तिला समजवतच म्हणाला .... " नाही सर , कोणीतरी आहे तो ... तो मिंटीग संपून बाहेर आली तेव्हापासून माझ्याकडे बघत आहे वाईट नजरेने . " आधी श्रीला तर काही समजलच नाही ही कोणाला म्हणते आहे . " ऋतुजा अगं तू हे काय बोलते आहे माझ्या अॉफीस मधलं कोणी आहे का ? तू सांग मला फक्त कोण आहे तो ? " " सर तो तुमच्याटिम मधला मेंमबर आहे उंचसा थोडा दिसायला सावळा ..." " कोण .... शरद बद्दल बोलतं आहे का तू आठ दिवस झाले तो कामाला लागून त्याचं प्रोफेशन बघून मी ठेऊन घेतलं काल मला मालती कडून ही त्याच्याबद्दल कम्पलेन्ट आली ... त्याचं काही तरी करावचं लागेल .... " ऋतुजाला धक्काच बसला ...."मालती कोण ? आणि तिला पण तो फॉलो करत असून तुम्ही त्याला अजून पर्यत काढून नाही टाकलं काही वाईट होण्याची वाट बघत आहात का तुम्ही ? " रागाच्या भरात ऋतुजा बोलून गेली ... " नाही ऋतुजा .... मालती आपल्या अॉफीस मधल्या client आहेत . त्या म्हणे मला त्या शरदच reputation काही योग्य वाटतं नाही सारखा अॉफीस मधल्या तरूणीकडे येता जाता बघत असतो तो ." ऋतुजा म्हणाली ," सर प्लिज त्याला उद्या काढून टाका तुम्ही तो उद्या मला इथे दिसला तर हा जॉब मी रिजाइन करेल .." शरद तिला समजावतच म्हणाला , " हो relax ..... प्लिज ! माझा नंबर नोट करून घ्या काही अडचण आली तर कॉल करा मला ओके , ड्रॉप करून देऊ तुम्हाला घरपर्यत ??" आपल्या स्कुटीकडे बघतच ऋतुजा म्हणाली ," नाही स्कुटी आहे निघते मी ..." ह्या एक महिण्यात ऋतुजा हळूहळू श्रीचा प्रेमात पडत होती .... आता दोघात छान मैत्री झाली होती दोघही तासनतास फोनवर गप्पा करतं रहायचं रात्र रात्र फोनवर चाटिंग चालायची झोप कशी लागायची दोघानाही कळायचं नाही

मृगजळ ( भाग -6)

ब्लँक फोरमल त्यावर ब्लू कलरचा छान टॉप तिने घातला ... 3 client ला घेऊन ती निघाली तिथे जाताच .... ती समोरच बेंचवर बसलेली होती तर श्री येताना दिसला .... काय दिसत होता ना तो ! हँन्डसम .... त्याच्या गव्हाळ चेहर्यावर काचेची चौकस फ्रेम असलेला तो गॉगल उठवून दिसत होता . फिक्ट गुलाबी रंगाच शर्ट त्यावर ब्राऊन रेगाठी टाय लावलेला श्री त्याला येतांना बघून सर्व अॉफीस मधले प्यून कर्मचारी उभे राहिले ... काहीही झालं तरी श्री त्याचा बाबांचा बिझनेस आता एकटा सांभाळत होता ... ऋतुजाला ऐव्हाना कळून चुकलं की श्री ह्या अॉफीसचा मालक आहे ... ऋतुजाकडे त्याच लक्षच नव्हतं तो सरळ आपल्या केबिन मध्ये गेला .. हा तोच श्री आहे ना ज्याने आपल्याला त्या रात्री पाऊसात घरी सोडून दिलं ... खरचं हा श्री एवढा संस्कारी कसा असु शकतो , हा श्री अॉलराऊन्डर तर नाही आहे ना ! असणारचं वाटतं ... माझ्या वाटण्या न वाटण्याने काय होतं मी तर कल्पना नव्हती केली की हे अॉफीस त्याचं राहू शकतं ... त्या रात्री श्री ने तिला घरी सोडून दिल्यानंतर झोप ही आली नाही तिला सारखा एकच प्रश्न मनाला छळत होता . मी माझं नाव सांगताच श्री ने गाडीला ब्रेक का मारला ? तो माझं नाव ऐकता घामाघुम का होऊन गेला ? तो दहावी पर्यत माझ्यावर्गात शिकला म्हणे म्हणून ऋतुजाने दहावीचा सेन्डफचा फोटो बघितला त्यात तिला श्री सारखा चेहरा असलेला सेम मुलगा दिसला ... हा फोटो तिला आता त्या क्षणाला श्री ला दाखवाचा होता ... पण मनात इच्छा असूनही ती दाखवू शकत नव्हती तिला वाटला हा आपल्याला चक्क वेड्यात काढणारं . तिला खात्री झाली होती श्री फलर्टींग नव्हाताच करतं खरं बोलत होता तो ! *******

मृगजळ (भाग -5)

श्री ........ त्या विचारकक्षेतून जागा झाला . आशुतोष भेटलाच कधी तर सांगू त्याला समजवून म्हणतं ... पण , आराध्या जग सोडून गेली हे त्याला ही माहिती नव्हतं . सुर्य उजाळला पहाटेचे पाच वाजताच आज ऋतुजाचा फोन वाजू लागला ... ट्रिंग ट्रिंगगगगगगग ट्रिंरीरीगगगगगSssssssss एवढ्या सकाळी आलाराम वाजायला लागला म्हणून ऋतुजाने फोन हातात घेतला तर तिच्या बॉसचा कॉल येतच होता ...... ओहहहहहहह नो " मिस्टर गोजावळे " डोळे चोळतच तिने कॉल रिसव्ह केला .... " हँलो सर , हं बोला ना ! काही काम होतं का ? " " ऋतुजा मँडम , मी फॉरेन टुरवर काही दिवसासाठी जातं आहो आज आपले ३ client घेऊन तुम्ही W4 अॉफीसला जा त्याच्या सोबत नवीन प्रोजेक्ट कालच मी साईन केला आहे . त्यांची सर्व जबाबदारी मी स्वतः सांभाळली असती मला हे म्हत्त्वाचं काम नसतं तर , ते काम आता मी तुम्हाला सोपवलेलं आहे .... तिथे मदतीला तुम्हाला वरिष्ट मिळतीलच काम योग्य रित्या समजून जाणीव पुर्वक करा काही अडचण भासल्यास मला कॉल करा ... ठेवतो मी ....." " सर सर पण ......" ऋतुजाच बोलणं ऐकून न घेता बॉसने फोन कट केला . नवीन प्रोजेक्ट W4 अॉफीस तर खुप मोठं आहे . तिथले वरिष्ठ आपल्या सोबत कसे Behavior करतील ह्याचं काळजीत ऋतुजा पडली .. तिने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण तिला झोप काही येईना ... तिने घडीकडे बघितलं तर साडेपाच वाजले होते . कोणी तिच्यासोबत बोलायलापण जाग नव्हतं .... ती तडख उठली आणि आशुतोषचा रूम मध्ये गेली .. रूम मध्ये किरर्ररर्र अंधार पसरलेला होता झिरो लाईटचा उजेडही नव्हता रूम मध्ये प्रवेश करताच तिने लाईट अॉन केले .... " दादा दादा उठना ..... उठ लवकर ." आशुतोष चिडतच तिला म्हणाला ," ये बावळट ऋते झोपू दे ना मला काय दादा लावलं ...." अस्वस्थ होतं ऋतुजा म्हणाली , ओके जाऊदे ....सॉरी झोप तू ." ऋतुजा अस्वस्थ झाली आहे हे तिच्या आवाजावरून कळताच कशाचाही विलंब न करता झोपेत खोंळबा करतं आशुतोष उठला आणि तिला म्हणाला ," अगं माझी माय काय झालं तुला एवढं नाराज व्हायला ..... हं सांग बघू आधी मला ! " जरा लटक्या स्वरातच ऋतुजा त्याला सांगायला लागते ..... ," अरे दादा बॉसचा कॉल आला होता नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करायचं आहे म्हणाले अॉफीस माहिती आहे कुठलं ते W4 ..." तिला समजवतच आशुतोष म्हणाला ," अरे यार तू पण ना गं उगाच टेन्शन घेते अजून तिथे जायचीच आहे .... तुला तर खुश व्हायला पाहिजे त्या अॉफीस मध्ये तुला तिथल्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळते आहे ..." आता कुठे आशुतोषने तिच्या चेहर्यावरील काळजीच सावट दुर केलं ... ऋतुजाचा चेहर्यावर हास्य फुललं ....

मृगजळ ( भाग -4)

आशुतोषने रूम तर सोडली आता जायचं कुठे म्हणून एक रात्र तो हॉटेल वर काढतो ... आराध्या त्याला कॉल करून करून त्रस्त होते . आशुतोषलाही काहीच सुचत नाही तिला हो म्हणावं की नाही नेमक करावं काय विचारची ससेहोलपट झालेली ... त्या रात्री तो रात्रभर झोपला नाही ... श्री पण त्याला सारखा कॉल लाऊन बघत होता पण , त्याला प्रतिउत्तर मिळत नव्हते आशुतोषने त्याचा नंबर ब्लेकलिस्ट मध्ये टाकला . दुसर्यादिवशी मित्राच्या मदतीने त्याला कॉलेज जवळच रूम मिळाली ... तिथून तीन महिण्यानी त्याने आराध्याला भेटायला बोलवले एका कॉपी शॉपमध्ये ती आली .... दोघेही असे बाहेर कॉपीशॉप मध्ये एकांतात तीन महिण्याने भेटत होते ... बाहेर पाऊसाच वातावरण मेघ एकत्र जमले सरीने बरसायला सुरूवात केली तसा आशुतोष आराध्याचा हातपकडून कॉपीशॉपचा आडोशाला घेऊन गेला पाऊस मुसळधार येत होता त्या दोघाना भिजवत होता जोराच्या विजा कडकडायला सुरूवात झाली ... आराध्याला विजाची खुप भिती ... एक जोराची विज कडाडली आणि आराध्याने भिऊन आशुतोषचा शर्टला गच्च पकडूनच घेतले लाहाणशा बाळासारखी ती आशुतोषला घट्ट पकडून होती तिचे ओले झालेले केस आशुतोषचा गालाला स्पर्शुन जातं होते ओठावरून सळसळत पाणी भिजलेल्या पापण्याचं चुंबन घ्यायावं असं आशुतोषचा मनात आलं ढग गडगडायला लागले त्या आवाजाने भानात येऊन आपण कुठे उभे आहोत ह्याची प्रत्यक्षात जान होताच आराध्या आशुतोष पासून दुर झाली ... ती आशुतोषला म्हणाली ," आशु तुझा होकाराच्या मी किती प्रतिक्षेत राहू ?? " आशुतोष तिच्यापासून नजर लपवत म्हणाला ," तुला वाईट वाटेल पण , मी तुझा एक मित्र होतो त्या पलीकडे मला कुठल्याही नातेसंबंधात अडकवू नको प्लिज ....." पावसाच्या बरसणार्या सरीच्या आवेशात आराध्याचे अश्रूही सळमिसळीत झाले होते ..... पण ते तिच्या डोळ्यातले अश्रू त्याला दिसतं नव्हते .... ती काही न बोलता तिथून जायला निघाली .... आशुतोषने लगेच तिचा हात पकडुन घेतला ..... " सोड माझा हात आशु ....." त्याला खरचं प्रेमाच्या बंधनात अडकायचं नव्हतं पण , तो तिला होकारही देऊ शकतं नव्हता , " घरी जाऊन तू खुप रडणार हो ना आराध्या ....." " तुला काय त्याचं ..... एवढं , नाही म्हणून माझं मन तोडल ना ! मिळालं मला माझं उत्तर ..." " आराध्या मित्र म्हणून रहा ना !" " अरे पण मी प्रेम करते तुझ्यावर ..... तुला कसं समजावू माझं प्रेम तुला मी मेल्यावरही कळणारं नाही ....." भरपाऊसात मरणाच तिच्या तोंडून नाव ऐकून आशुतोष तिला एक थापड मारतो ... " तू वेडी आहेस का आराध्या ......." त्याला कवटाळत .... " हो हो हो .... आशु मी तुझ्यासाठी वेडी आहे अरे ! " तिला दुर सारत आशुतोष म्हणाला ," प्रेमाच हे वेड सोडून दे मी इथे शिक्षणघेण्यासाठी आलोय तुझ्यासोबत अय्याशी करण्यासाठी नाही . " आशुतोषचा स्वभावच असा होता आधी तर त्याने आराध्याला काही कालावधी मागितला होता ... नंतर तिला सांगितलं फक्त मित्र म्हणून रहा ... त्याला आराध्याचं प्रेमच स्विकारायचं नव्हतं तर त्याने श्री आणि इतर त्याचे रूममेटस ह्याच्या सोबत काही न बोलता समजून न घेता बाहेर पडायला नको होते .... आशुतोष नंतर कॉलेज संपूर्ण झाल्यावरही कधीच आराध्या सोबत बोलला नाही ती मात्र त्याचा सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होती आणि हा सततचा तिला टाळतच राहिला ... त्यादिवशी कॉलेजची चार वर्ष संपून फेरवेल पार्टी आयोजित केली होती ..... पार्टीत आराध्या लाल कलरचा गाऊन घालून आलेली होती त्यावर वाईट डायमन्ड इअररिंग तिने लावलेले होते ... तिचा गौरवर्ण चेहर्यावर तो पेहराव शोभून दिसत होता ... पार्टीत सर्व मुलांची नजर तिच्यावर रोखून धरत होती ... आशुतोषचा मनात येऊन गेलं शेवटचं वर्ष संपल कॉलेजही पण इथून काहीच सोबत येणार नाही आपल्या शिवाय इथे घालवलेल्या आठवणी ! आज ह्या पार्टीतच मी आराध्याला प्रपोज केलं तर माझ्याकडून किती जिवापाड प्रेम करते ना ती आपल्यावर आता ही करतच असेल .... म्हणून तो ती उभी असते हातात ज्युसचा ग्लास धरून तिथे तिच्या जवळ जाऊन आपल्या गुढघ्यावर वर बसत तिचा उजवा हात हातात घेत सर्वाचा समोर म्हणतो , " आय रियली ल्व यू सो मच आराध्या ......" आराध्याला आकाश ठेगणं वाटायला लागते सारं जग तिच्या सोबत असल्याचे भास आभास रंगून जातात ती ह्याचं क्षणाची वाट बघत बसलेली असते .... 🌷🌷🌷 पण , नियतीला त्याचं उमलेलं प्रेमपुष्प बहरू द्यायचं नसते ..... प्रेमात बहरणं म्हणजे जग प्रेममय होणं त्या प्रेमात सुख दुख: आप्तस्वकीय सर्वाचा वाटा त्या प्रेमाला कुणाची नजर लागावी आणि अजणं फासत पापण्यांच्या कडेला गतकाळची उघड्या डोळ्याने पाहिलेली स्वप्ने अश्रूधारे सोबत वहात जावी .... असचं काही झालं आशुतोष आणि आराध्याच्या सोबत !! आराध्याला गर्भाशयाचा कँसर झाला .... हे खुप उशिरा कळलं आणि जेव्हा कळलं तेव्हा खुप उशीर झाला होता .... आराध्या जग सोडून निघून गेली आशुतोष आजही तिच्याच आठवणीत जगतो तिच्याच प्रेमसागरात स्वतः ला झोकून घेतं ती इथेच कुठेतरी आपल्या सोबत आहे म्हणून तो एकांतात तिच्या फोटोसोबत गप्पा मारत बसलेला असतो .... प्रेम हे असतचं असं ! रडवणारं हसवणारं कधी कधी सोडून गेल्यावर विरह यातनेत दुखाचे हेलकावे देणारं ...... आशुतोषला वाटलं आपण आधीजे तिला बोललो त्यावर ठाम असतो तर आज एवढा स्वतः ला त्रास नसता झाला ... पण , माझ्या होकाराने तिचा जीव सुखावला तिची इच्छा अधूरी नाही राहिली तिने केलेलं प्रेम पुर्ण झालं .... आता ती निघून गेली ह्या प्रेम वाटेवर आशुतोषला एकट्याला सोडून पण तो एकटा नव्हताच मुळी दोघातला एक निघून गेल्यावर प्रेम संपत असं कुठे बधिस्त आहे ... ते चिरकाल त्याच्या सोबत जगतच असतं ...

मृगजळ ( भाग -3)

तिकडे श्री घरी जाऊन बिछाण्यावर खिळला ... आईने त्याला जेवन करायला आवाज देऊनही तो बेडवरून उठला नाही ... सारखा ऋतुजाच्याच विचारात मग्न होता . त्याला कळत नव्हत आपल्या सोबत का होत आहे असं ?? आपण कोणत्या दुनियेत जगत आहोत ?? आज तिच माझी ऋतुजा जिच्यावर मी प्रेम केलं तिला मी घरी ड्रॉप करून दिलं पण , एवढा वेळ सोबत घालवून आपण तिच्या समोर आपल्या मनातली भावना व्यक्त नाही करू शकलो ... नाही तिला असं सांगणार कसं आपण ?? की , मी तुझ्यावर प्रेम करतो ती तर चक्क विसरूनही गेली आपण दहावी पर्यत एकाच वर्गात होतो .. तिला खरचं आठवत नसेल का ? नाही तिने आठवूण घेण्याचा मुद्दामहून प्रयत्न नसेल केला .... माझं प्रेम हे एकतर्फीच राहिल शेवटपर्यत माझ्यासाठी कारण , मला वाटतं ऋतुजा माझी कधी होऊच शकणारं नाही ... ( श्री मनातल्या मनात कोसत होता स्वतः ला .) तीन चार वर्षाआधी बीटेक करण्यासाठी जेव्हा श्री दिल्लीला गेला होता तेव्हा त्याच्या शहरातल्या मित्रासोबत ऋतुजाचा भाऊ आशुतोष त्याचा रूममेट म्हणून तिथे पाचसहा महिण्याने राहायला आला ... आशुतोष हा मेडिकलचा स्टुडन्ट आणि श्री हा इंजीनियरिंगचा स्टूडन्ट तरी दोघामध्ये मस्त गट्टी जमली .... एका शहरातलेही होते ते दोघ बाकी तीन मित्र दुसर्या शहरातले असे पाच मित्र एका रूममध्ये रहायचे .. काही दिवसानं श्री आणि आशुतोषला जानवून आलं आपली गाण्या पासून कलर पासून खाण्यापर्यतची चोईस किती सारखी आहे ... टी-शर्ट घ्यायला दुकानात गेल्यावर जे शर्ट आशुतोषच्या पसंदीला यायचं तेच श्रीला ... रूममधले तिघ मित्र जयेश , रंजित , पराग ते तर ह्या दोघाना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून चिडवायचेही ... वर्षाचा शेवट शेवट श्रीच बीटेक संपत आलं तेव्हा झालं काय .... पराग एका मुलीच्या प्रेमात पडला ती मुलगी आशुतोषचा मेडिकल कॉलेज मधली त्याची क्लासमेटच त्याच्याच रुमच्या समोर तिची चार फ्लोरची इमारत होती . ती मुलगी जाता येता सारखी परागच्या नजरेत भरायची तो तीला रूममधूनबघत रहायचा ती बाहेर कधी पडते म्हणून .... ती बाहेर पडली की हा सारखा तिचा जाण्यायेण्यावरचा पहारा ठेऊन बसलेला असायचा ... तिचं नाव होतं आराध्या .... ती दिसायला छान आहे म्हणून पराग तिच्या सौदर्यांला भुलला पण , तिला कळलं आपला क्लासमेट आशुतोष इथे समोरच रहातो .. ती त्याच्या सोबत हळूहळू ओळख पटवण्याचाही प्रयत्न करते .. मित्र म्हणून तो तिचा संपर्कात असतो ती मात्र आशुतोषचा प्रेमात पडते .. कॉलेजला जाता येता ती त्याला लिफ्ट देते ... परागला वाटते आशुतोष आणि आराध्या मध्ये काही चालूच आहे .. तो तसं त्याला डायरेक्ट विचारू शकतं नाही .. आपल्या मनातील भावना तो कुणाच जवळ व्यक्त करू शकतं नाही . जयेश तो तर बाहेर असायचा कॉलेज पार्ट टाईम जॉब ह्यातच त्याचा वेळ निघून जायचा . रूमवर येऊन तो कधीकधी न जेवता झोपी जायचा .. रंजित त्याला तर पुस्तकाच्या पलीकडचं जग ठाऊकच नव्हतं म्हणावं लागेल ... श्री जवळ वेळ असायचा दिवसभर कॉलेज मधून आल्यावर चार नंतर तो रूमवर पडूनच आपला पुर्ण वेळ स्टडीला दयायचा .. पराग कॉलेजवरून आल्यावर त्याला एकदा वाटलं आपल्या मनात साचलेला सर्व गाळ आपण आज श्री समोर उघड करावा तो नक्कीच मला समजून घेईल म्हणून पराग आपली कॉलेजची बँग खांद्यावर उतरवून ठेवत श्री जवळ जात त्याला म्हणतो ," श्री मला तुला काही सांगायचं आहे ...." त्याच्याकडे बघत श्री म्हणतो ," हं सांग ऐकतो आहे ...." .... ...... " मी ....." " हं समोर बोल .... "श्री परागला म्हणतो .... " मी ..... एका मुलीचा प्रेमात पडलो . " घाबरतच त्याने श्री ला बोलून दाखवलं .... " काय वेड विड लागलं का तुला की प्रेमाचं भुत झोमलं .... कोण ती ? " त्याला रागवतं आणि दटावतच समोरचा प्रश्न श्रीने केला ... " ती आराध्या ... आपल्या रूम समोरची इमारत ." आपल्या रूम समोरच्या इमारतीत कोणी आराध्या रहाते हे तो पहिल्यादा परागच्या तोंडून ऐकत होता श्री मुलीपासून खुप लांब होता दरम्यान चा काळात पाचवी सहावी पासुन आणि नंतरही त्याच्या मनात घर करून होती ती ऋतुजा ... " मग सांग ना तिला जाऊन ...." ...... ...... ...... ...... दोन तीन मिनिट स्तब्ध राहून पराग म्हणाला ," अरे ती माझी नाही होऊ शकतं ." परागच्या मनात शंका होतीच की आशुतोष आणि आराध्या मध्ये काहीतरी सुरू आहे . तो तसचं श्री ला बोलला . पण , पराग समजतं होता तसं त्यांच्यात काहीच नव्हतं . " तिच्यावर दुसरा कोणी तरी प्रेम करतो ...." " तुला कसं माहिती ?? " तो कोण आहे हे विचारण्या ऐवजी श्री ने त्याला विचारले . " बघितलय रे मी स्वतः च्या डोळ्यांनी ......" रडवल्या स्वरात मनात खेदाची भावना उत्पन्न करून पराग बोलला . " ओहहहहह मग जाऊ दे ना तिच्या सुखाची आस धर ती त्याच्यासोबत खुश आहे ना ! ह्यात तू आनंद मानून जग ...." " पण , मला तिला सांगायच आहे ....." " तुला जे वाटते ते कर ....." त्याच्यावर चिडतच श्री म्हणाला . परागने आपल्या बँग मधून रजिस्टर काढलं त्याचं पेज फाढल आणि लिहायला बसला .... त्याची ही activity बघून श्री वैतागतच त्याला म्हणाला ," हे काय करतो आहे आता ...." " चिठ्ठी लिहितो आहे तिला ......" चिठ्ठीवर प्रिय आराध्या लिहतचं तो उद्गारला . त्याच दिवशी आराध्या आशुतोषला बागेत नेऊन प्रपोज करते . आशुतोष तिला प्रपोज स्विकारायला काही अवधि मागतो . परागची चिठ्ठी लिहूनही पुर्ण होते .. पण , तो ती चिठ्ठी स्वतः तिला द्यायला तयार होतं नाही .. तो हे काम श्री ला सांगतो . " श्री अरे तू मित्रासाठी एवढं नाही करू शकतं का ? प्लिज माझ्यासाठी ती येतच असेल तू बाहेर जाऊन उभा रहा ती आली की दे तिला ही चिठ्ठी ..." आराध्या एकटीच त्या दिवशी आपल्या कारने येत होती आशुतोषला काही काम होतं म्हणून तो कॉलेज मध्ये थांबला होता .... आराध्याची कार येताना दिसली तसा श्री समोर जाऊन उभा राहिला ती कार मधून उतरतच त्याने ती चिठ्ठी आराध्याला देत म्हटलं ," हे चिठ्ठी तुझ्यासाठी ...." ती त्याच्याकडे एकटक बघतच होती तिला मनात वाटलं हा तर आशुतोषचा रुममेटस ना ! ती म्हणाली ," आपले नाव ??" " श्री ...." असं म्हणतच तो तिथून वेगाने रूम मध्ये आला .. आराध्या आपल्या बेडरूममध्ये जाऊन फ्रेश झाली आणि ती चिठ्ठी वाचायला हाती घेतली .... तिला वाटलं नव्हतं आपल्या वर एवढं प्रेम करणारा कोणीतरी आहे . क्षणभर तिच्या डोळ्यातून आसवाची गळती होत होती .... पत्राच्या खाली परागने तुझ्यावर प्रेम करणारा मी एकतर्फी प्रेमी असं टाकल्याने तिला वाटलं श्री तिच्यावर प्रेम करतो आणि ते पत्र तिला श्री ने दिल्याने तिला हे आशुतोषला सांगायचच होतं म्हणून ती ताबडतोब कॉल करून एका कॉपी शॉप मध्ये आशुतोषला भेटायला बोलवते त्याला ते पत्र दाखवून ती सांगते हे पत्र मला श्री ने दिलं .... आशुतोषच्या पायाखालची जमिनच सरकते त्याचा विश्वास बसत नाही श्री असं करू शकतो ह्या गैरसमजूतीतच तो कुणाच एक न ऐकून घेता त्याच रात्री रूम सोडून जातो ....

मृगजळ ( भाग - 2)

ऋतुजाच घर आलं .... घराच्या समोर कार पोहचताच ती श्री ला म्हणाली , " थांबवा .... आलय माझं घर very very thanx तुम्ही नसते आलात तर अद्यापही मी तिथेच थंडीत कुडकुडत बसलेली असती सरीना झेलत .... " तिला गोड स्माईल देतं , " सांभाळून जा ! " एवढच म्हणतं त्याने गाडी सुरू केली ..... गेट उघडून आत शिरतचं ऋतुजा स्वतः शीच पुटपुटली ," संभाळून जा म्हणे ..... हं ह्या वाक्याची गरज तर मला नसून त्यांना होती ..." ऋतुजाचे घरात पाऊल पडताचं , " काय हे ऋतुजा कुठे थांबली होती एवढ्या पाऊसात अंग आशुतोष कधीचा कॉल करतोय तुला रिसिव्ह करून सांगायच तरी , आम्ही किती टेन्शन मध्ये होतो इकडे माहितीये तुला ?? " किचन मधून स्वयंपाक आटोपून हॉल मध्ये प्रवेश करतच तिच्या आईने आपलं बोलणं सुरू केलं ... " अंग आई आली ना आता घरी मी जाम भुक लागली आहे मला काहीतरी खायला दे ! पोटात कावळे ओरडून राहिलेत माझ्या .... " ऋतुजा बाहेरून येऊन थकून गेली होती सोफ्यावर पडतचं ती आईला बोलत होती .. " आता आपण सर्व जेवन करून घेऊ .... बेटा तू आता आमच्या सोबत जेऊनच घे ! " तिचे बाबा रूमच्या बाहेर येत केशवराव तिला म्हणाले आणि त्यांनी लगेच जेवणासाठी आशुतोषलाही आवाज दिला .....

मृगजळ ( भाग -1)

काळोख गर्द पसरलेला त्या अंधारमय सडकेवरून वाहनाची रेलचेल जरा जास्तच होती . मुसळधार पाऊस रस्त्यांच्या कडेला असलेली गंटारे नाल्या तुडूंब भरलेल्या . श्री ला समोरचं काचेतून काहीच नव्हतं दिसतं काचावरही सततची न थांबता पडणारी पाऊसाची धार तो वैतागून गेला . आज पहाटे पासून पाऊसाची रिपरिप सुरू होती तो असा अचानक वेग धारन करून तांडव करेल ह्याची पुर्वकल्पना ऋतुजाला पण नव्हती म्हणून ती अॉफीस मधून आपली सर्व काम आटोपून जरा उशिराच घरी जायला निघाली .. दहा आटोला तिने समोर हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थच ! एकही आटो थांबायला तयार नव्हता ... आता काय करावं घरी पोहचणं होणारं की नाही माझं ....ह्याच विचाराने ऋतुजाचा जीव त्या पाऊसात खालीवर होत होता ... वारा वेग धारण करून आडवा तिडवा सरीचा शिरकावं करतं होता तसं ऋतुजाच्या मनात प्रश्नाची कालवाकालव होतं होती ... घरी फोन तरी तेवढ्या पाऊसात कसा करणारं आधीच चिप्पप .... भिजलेली होती ती कुठे एखाद्या रेस्टोरेंट मध्येही जाऊन विसावा नव्हती घेऊ शकतं ... सैरावैरा नजरेने ती इकडेतिकडे शोधाशोध घेतं उभं रहायला जागा धुडाळतं होती तर तिला आडोशाला उभ्या असलेल्या पुरूषांचीच गर्दी दिसतं होती .... तिच्या मनाला वाटलं तिथं थांबून आटोही मिळणार नाही . असुदेत आता ! रहावं इथेच उभं म्हणून ती येणार्या आटोला हात देऊन थांबवीत होती . पण , कोणताच आटो ती रहाते त्या एरिया मध्ये जायला तयार होत नव्हता कारण तिथून तिचा एरिया अर्धा पाऊन तासाच्या दुरीवर होता . ऋतुजाला दुरवरून एक कार येतांना दिसली तिला वाटलं आटो थांबायला तयार नाहीच आहेत काय करावं ?? ह्या कारला हात देऊन बघते आपल्या एरियाकडे जाणारी असेल तर बरचं होईल . मनात धास्तावलेलीच होती ऋतुजा पण काय करणार अर्धा तास जास्त झाला होता ती उभी होती काही option नव्हतं तिला घरी जायला .. रात्रीचे आठ वाजले होते ... श्री वेगात कारने घराकडे जात होता त्याला समोर गेल्यावर भास झाल्यासारखं वाटलं ... कोणी तरी लेडिज आपल्याला लिफ्ट मागते आहे ... त्यांने कारची स्पीड स्लो करतं मागे वळून बघितलं ... तिथे त्याला अंधारात उभी असलेली तरूणी दिसली .... त्याने आपली कार मागे घेतली ..... ऋतुजा समोर येऊन कार थांबवत त्याने काच खाली केला ... ऋतुजा काचाजवळ जातच त्याला म्हणाली , " आपण बेजनवाडीला चाललात का ? " बेजनवाडी नाव ऐकताच क्षणभर सुटकारा घेतं श्री मनातच म्हणाला ... इथून किती दुर आहे ह्या मुलीला पण तिथचं जायचं होतं का ?? पण , त्याने ती रात्रीची वेळ आणि परिस्थिति बघून जास्त विचार न करता कारचा दरवाजा उघडला .. त्या पाऊसाने चिंब भिजलेली ऋतुजा त्री ला म्हणाली , " मी चिंब भिजलेली आहे बसू शकते ना शिट वर ....." श्रीने होकारार्थी मान हलवली तशी ती त्याच्या बाजूच्या शिटवर बसली ... श्री तसा संस्कारी सुसंस्कृत घराण्यातला मुलगा ... लहानपणापासून त्यांच्यावर घरून चांगलेच संस्कार पडले नेहमी अडचणीत मदत करणारा परस्त्रीचा सन्मान करणारा स्त्री सन्मानाला ठेच न पोहचू देणारा हा श्री ... ऋतुजा त्यांचा बाजूला आपलं अंगचोरून बसली श्रीने अद्यापही तिच्याकडे मानवळवून बघितलेलं नव्हतं . त्याने कमी आवाजात गाणे सुरू केले ... एवढ्या पाऊसातही श्रीने गाडीतला एसी मात्र बंद केला नव्हता .. आणि ऋतुजा ती बिचारी थंडीने गारठून गेली तिला वाटलं कार मधून उतरून तरी जावं ह्या महाशयाला कोण सांगेल एसी बंद करायला ... उगाच बसू दिलं म्हणेल ... तिची हुरहुर वाढली अंगाला काटे आले होते . चुकून श्रीची नजर तिच्यावर पडली आणि तो मनातच म्हणाला ," कुठे तरी बघितल्यासारखं वाटते पण कुठे ?? " तो विचाराचा तद्रीत पडला तसं त्याला जाणवलं ऋतुजा थंडीने अकडून राहिली ... त्याने एसी बंद करतच तिला म्हटलं , I Am sorry for that ..... माझं लक्ष नव्हतं तुमच्याकडे Relax ....हं असं म्हणतं श्रीने आपल्या अंगातला कोट काढत तिच्या समोर ठेवतं म्हणाला ," हे घाला ऊब मिळेल तर जरा बरं वाटेल ...." नाही म्हणावं पण , तिला वाटलं त्याचा अपमान होईल म्हणून तिने थँक्यु म्हणतं कोट कसातरी स्वतः भोवती लपेटून घेतला ... श्री आपल्या भुतकाळात हरवून गेला त्याला त्याचा भुतपुर्व आठवणी त्याचा जीवनातल्या कशा मिटणार होत्या .... तो पाचवी पासून दहावी पर्यत वर्गात एकाच मुलीवर प्रेम करायचा तिला चोरून बघायचा तिच्या नकळतच प्रेम केले त्याने तिच्यावर आपल्या प्रेमाची चाहूल तिला न लागू देता ... ती होती ही त्याच्यासाठी स्वप्नातली परी लक्ष वेधून घेणारी साधी रहाणी तिची त्याला खुप आवडायची ..... गोरवर्ण चंद्रासारखा तिचा तो लोभस मुखवटा त्याचा नजरेत आजही कैद केलेला होता ! तीचं नावही ऋतुजा त्याच्या ओठातच रेंगाळत होतं ती हिच असावी का ही शंका त्याच्या मनात येऊन गेली ... कारण व्यक्ति कितीही मोठा झाला तरी चेहरा तोच असतो . तिला ही जरा वाटायचं ह्याला कुठेतरी बघितलं पण तिने चक्क त्याला आठवायलाच स्वतः ला नकार दिला .... आपल्या मनातील संदेह दुर करण्यासाठी म्हणून त्याने चाचरतच तिला विचारलं ," " तुमचं नाव काय ? " ....... तिने हसतच उत्तर दिलं " माझं नाव .... ऋतुजा !" ऋतुजा नाव ऐकताच त्याच्या बॉडीला शॉक बसावा आणि झिनझिण्या लागाव्या असं शहारलं त्याने गाडीला ब्रेक मारला .... जाणून नाहीच ! काय होतयं आपल्या सोबत हे आणि का ?? ह्या कोड्यात तोच फसला होता .... गाडीला असं अचानक ब्रेक का दिला ?? म्हणतचं ती त्याच्याकडे बघू लागली खिशातून रूमाल काढत ऐवढ्या पावसात तो घामाच्या धारा पुसत होता .. " तुम्ही ठिक आहात न ...." जरा काळजीच्या स्वरात तिने श्री ला विचारले ... हो .... म्हणतं त्याने आपली गाडी सुरू केली गळ्याला बांधलेला टाय एका हाताने सैल करत तो म्हणाला , " माझं घर आलय .... तुमचं इथून पंधरा मिनिट दुर आहे ! " तिला वाटलं आता ह्याचं घर आलं तर मला हे सोडून कसे देतील ... नाराजीने ती म्हणाली , " ठिक आहे मी आटो बघून घेईल नाहीतर जाते पायी चालत तुम्ही थांबवून द्या इथेच . " श्री ज्या मुलीवर प्रेम करायचा ही तिचं त्याची ऋतुजा होती ... त्याला ह्याची आता पुर्णपणे खात्री बसली आपलं प्रेम म्हणून आणि माणुसकी ह्या नात्याने तो एका स्त्रीला एवढ्या रात्री भर पाऊसात एकटीला वँन मधून उतरून जायला कसा सांगेल .. त्याचं घर आलं म्हणून हे नक्कीच त्याच्या स्वभावगुणात नव्हतं ... तो ऋतुजाला म्हणाला ," मी देतो तुम्हाला सोडून ... घरपर्यत एवढ्या पाऊसात काय मिळणार तुम्हाला रात्रभर माझ्या घरासमोर उभं रहावं लागेल आणि ते मला कसं पटणारं हवं तर तुम्ही आज रात्र माझ्या घरी थांबू शकता उद्या पाऊस कमी झाला की देतो सोडून घरी आई आहेच माझी ..." त्याचं नॉनस्टॉप बोलणं ऐकून ऋतूजा त्याला हसतचं म्हणाली , " नको नको द्या मला घरीच सोडून ..." तिचं बोलणं झाल्यावरही ती गालातल्या गालात हसतंच होती .. तिला असं पहिल्यादा हसतांना बघून श्री ही तिच्या हसण्यात सहभागी झाला .... तिने आपल्या बँग मधून फोन काढला ती फोन बघते तर तिचा भाऊ आशुतोषचे पंधरा मिसकॉल दहा मँसेज बघून ती हैरान झाली ... आणि डोक्यावर हात ठेवतच म्हणाली , " दादापण ना किती काळजी करतो ह्या पाऊसाच्या पुरात त्याची बहिण वहात नसती गेली , आता घरी जाऊन खुप रागवणार हा ....." तिचं बोलणं ऐकतचं श्री म्हणाला ," तुला मोठा भाऊ आहे का ? नावं काय त्याचं ?? " " हो आशुतोष इनामदार ...... दोन वर्षांनी मोठा आहे माझ्यावर त्याचीच घरात दादागिरी चालत असते ..." तिने हसतच त्याला सांगायला सुरूवात केली .... श्री च्या चेहर्यावर नाराजीचे सावट पसरले होते ते नाव ऐकून कारण ऋतुजाचा भाऊ श्री चा कधीकाळचा रूममेट बेस्ट फ्रेन्ड आणि नंतर शत्रु झाला होता काही गैरसमजूतीमुळे .....